वै. मारुती बाबा चव्हाण यांच्या ७१ व्या पुण्यस्मरण सप्ताह निमित्त तुलशी रामायण कथा मोठ्या उत्साहात संपन्न

कैकयी च्या अट्टाहासापायी भरताला राज गादी ,प्रभू रामांना वनवास -ह.भ.प.अर्जुन महाराज चौधरी
राहाता -(प्रतिनिधी) वै.मारूती बाबा चव्हाण 71 व्या पुण्यस्मरण सप्ताह निमित्त तुलसी रामायण कथा आयोजित करण्यात आली आहे.कथेतील चौथे दिवसाची सेवेत महाराजांनी भाविकांना आपल्या रसाळ वाणीतून प्रभू रामांचा वनवास,सेेवक कथेतील भक्ती,कैकई चा अट्टाहास या प्रसंगाचे विवेचन सोप्या मार्मिक भाषेत विशद केले. यावेळी महाराज म्हणाले की,साधूंच्या निर्याणाने दुःख होते.दुर्जनाचे जन्माने दुःख होते.दुर्जनांची संगती कामाची नाहीच.जन्मो जन्मी साधुं चा वियोग होवु नये.महाराष्ट्राचे भाग्य आहे जेथे सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहीली.मायेचा पगडा सुटत नाही.तो पर्यंत संसाराची आसक्ती कायम राहते. वशिष्ट मुलींची ईच्छा होती.प्रभू रामचंद्र हे अयोध्येचे राजे व्हावे.त्यांचा राज्याभिषेक व्हावा.पण मंथंरेच्या मनात वाईट विचार आले.तो भुमीचा दोष होता.दुर्गन मनात शिरला.कैकई च्या मनात दुर्दैवाने घर केले.प्रभू रामचंद्र अयोध्याचे राजे होणार या निरोपाचे कैकई दुःखी झाली.तिने दशरथ राजाकडे दोन वर मागून घेतले.तिच्या मनातील दुर्गुणांचा तिने दशरथ राजाकडे भरताला राज गादी व प्रभू रामचंद्रांना वनवास मागितल्यावर प्रभु रामाना वनवास होवु नये म्हणुन दशरथ राजे ही विव्हळले. हात जोडले पाया पडले.कैकई मातेला वंदन करून प्रभू रामचंद्र वनवासाला गेले.केवटाची भक्ति अप्रतिम होती.प्रभु रामचंद्रांनी देखील केवटाच्या भक्ति पाहुन चकित झाले.भक्तिचा निष्काम तट अशी केवटाची ओळख होती. अर्जुन महाराज चौधरी यांनी अतिशय सोप्या भाषेत तुलसी रामायण कथेचे चौथे पुष्प गुंफूण भाविकांना मंत्र मुग्ध केले. या वेळी ज्ञानेश्वर सोमवंशी,विधीज्ञ रामनाथ सदाफळ, गजानन जेजुरकर, श्रीमती भालेराव, जाधव गुरुजी याचे हस्ते आरती करण्यात आली होती.सप्ताह कार्यक्रमाचे नियोजन बंधु नाना वाबळे, सुरेश चव्हाण,ज्ञानेश्वर सोमवंशी,गजानन जेजुरकर, नंदलाल मखाना,रोकडे साहेब, आप्पासाहेेब जाधव,महीला भजनी मंडळ, मारुती बाबा भजनी मंडळ विशेष परिश्रम घेत आहे.




