Breaking
ब्रेकिंग

शिर्डीतील भाविकांनी मोठ्या संख्येने ,भक्तीभावाने व उत्साहाने घेतले श्रीक्षेत्र पुणतांबा येथे संत योगी चांगदेव महाराजांचे दर्शन

0 1 3 5 8 0

शिर्डी(प्रतिनिधी) श्री क्षेत्र पुणतांबा येथील योगीराज संत चांगदेव महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढ वद्य एकादशीनिमित्त भाविक भक्तांची वारीसाठी गर्दी होती सालाबादप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातुन लगतच्या परिसरातील वारकरी व भाविक दिडीयांसह मोठ्या संख्येने उत्साहात समाधी दर्शनासाठी श्री क्षेत्र पुणतांबा येथे येतात पंढरपूर वारी पूर्ण केल्यानंतर पुणतांब्याची वारी केल्याशिवाय वारीचे फळ मिळत नाही अशी वारकरी संप्रदाय भाविक भक्तांची श्रद्धा आहे तर काही भक्तांचा विश्वास आहे की पंढरपूर वारी नाही झाली तर पांडुरंग हे साक्षात पुणतांबा येथे येतात आपण श्री क्षेत्र पुणतांबा वारी केली सर्वकाही मिळाले तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची यात्रेची परंपरा आहे लगतच गोदावरी नदीत स्नान करून भाविक चांगदेव महाराज आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात विठ्ठलाच्या जयघोषात परिसर दुमदुमून जातो या श्री क्षेत्र पुणतांबा वारीसाठी शिर्डी येथील श्री १००८ श्री महामंडलेश्वर स्वामी कशिकानंदजी महाराज शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा पालखी पायी दिंडी सोहळा समिती शिर्डी व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी साईभक्त यांच्या सहकार्याने शिर्डी ते पुणतांबा येथे जाते गेल्या वीस वर्षापासून चालू असलेल्या श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळा तसेच शिर्डी क्षेत्र ते पुणतांबा क्षेत्र पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने भजन टाळ -मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामस्मरणाने परिसर भक्तीमय वातावरणात संपन्न झाला . दिंडीच्या माध्यमातून श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकोपा जपण्याची परंपरा दरवर्षी कायम ठेवण्यात आली. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन मा. श्री विठ्ठल पवार पत्रकार श्री भगवान थोरात प्रशांत अग्रवाल यांच्यासह प्रतिष्ठित, सामाजिक, राजकीय, पायी दिंडी सोहळ्याला सहकार्य करणारे अन्नदाते,दिंडी समिती वारकरी गण व भाविक मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे