Breaking
ब्रेकिंग

शिर्डी प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक समस्या तातडीने सोडवणार-नगरसेवक अमित शेळके

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये अंगणवाड्या, रस्ते, उद्याने तसेच पाणीसाचण यांसारख्या गंभीर नागरी समस्या निर्माण झाल्या असून त्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेवक अमित शेळके पा. यांनी शिर्डी नगरपरिषदेला निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आलेल्या प्रमुख मुद्द्यांनुसार, माळीनगर परिसरातील अनेक अंगणवाड्या अत्यंत खराब अवस्थेत आहेत. इमारतींच्या भिंतींना तडे गेले असून पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच अस्वच्छतेमुळे लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
रिंग रोडपासून नगरपरिषदेच्या ताब्यातील उद्याने सध्या बंद अवस्थेत असून, ती नागरिकांसाठी तातडीने खुली करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय माळीनगर–बायपास रोडवरील हॉटेल ॲपल साई समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रभागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून गवत व झुडपांची वाढ झाली आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी तातडीने साफसफाई, फवारणी व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन नगरसेवक अमित शेळके यांनी दिले असून, नगरपरिषदेकडून त्वरित व सकारात्मक कारवाईची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अंगणवाड्या, रस्ते, उद्याने तसेच पाणीसाचण यांसारख्या गंभीर नागरी समस्या निर्माण झाल्या असून त्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेवक अमित शेळके पा. यांनी शिर्डी नगरपरिषदेला निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आलेल्या प्रमुख मुद्द्यांनुसार, माळीनगर परिसरातील अनेक अंगणवाड्या अत्यंत खराब अवस्थेत आहेत. इमारतींच्या भिंतींना तडे गेले असून पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच अस्वच्छतेमुळे लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
रिंग रोडपासून नगरपरिषदेच्या ताब्यातील उद्याने सध्या बंद अवस्थेत असून, ती नागरिकांसाठी तातडीने खुली करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय माळीनगर–बायपास रोडवरील हॉटेल ॲपल साई समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रभागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून गवत व झुडपांची वाढ झाली आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी तातडीने साफसफाई, फवारणी व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन नगरसेवक अमित शेळके यांनी दिले असून, नगरपरिषदेकडून त्वरित व सकारात्मक कारवाईची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे