Breaking
ब्रेकिंग

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत शासनाने लागू केलेल्या एक किलोमीटरचा नियम बदलून पाच किलोमीटर करण्यात यावा. महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

0 0 4 2 4 0

​शिर्डी: ( प्रतिनिधी)
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत शासनाने लागू केलेला १ किलोमीटरचा नियम जाचक असून, तो बदलून ५ किलोमीटर करण्यात यावा व पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात, या मागणीसाठी आज महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या वतीने शिर्डी येथील माननीय गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
​शासनाच्या नवीन सूत्रानुसार, १ किलोमीटर अंतरावरील शाळा निवडण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, यामुळे पालकांना मर्यादित पर्याय उपलब्ध होत असून अनेक विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही मर्यादा ५ किलोमीटर पर्यंत वाढवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील अधिक शाळा निवडता येतील, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
​तसेच, आरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर अनेक नामांकित शाळांची नावे तांत्रिक कारणांमुळे दिसत नाहीत. यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या शाळा तांत्रिक प्रक्रियेत त्वरित समाविष्ट कराव्यात, अशी आग्रही मागणी विद्यार्थी सेनेने केली आहे.
​याप्रसंगी महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत रवींद्र वाघचौरे, अभिषेक पोपलघट, गौरव भालेराव, चेतन झिंजाड, रुषी धिवर यांसह संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (2 votes)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे