Breaking
ब्रेकिंग

स्त्री शक्तीचा सन्मान महाराष्ट्राचा अभिमान जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित दामिनी राष्ट्रीय पुरस्कार समारंभ भव्य आणि दिव्य सोहळ्यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ सज्ज: राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे

0 0 6 5 0 7

शिर्डी (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीत स्त्रीला ‘शक्ती”मानले गेले आहे मात्र प्रत्यक्षात महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. शिक्षण संपत्तीवरील हक्क आणि राजकारणातील सहभाग या क्षेत्रात महिलांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा होत्या तरीही अनेक महिलांनी परंपरेच्या चौकटी मोडून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे म्हणूनच स्त्रियांचे संघर्ष कर्तुत्व व समाज निर्मितीतील योगदानाचा गौरव करणाऱ्या जागतिक महिला दिनाचे अवचित साधून नाशिक परिसरातील समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करून विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांचा गुणगौरव करावा व त्यांचे कार्य नवीन पिढीसमोर अधोरेखित करावे. यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री महेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि दिव्य असा दामिनी राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ सोहळा रविवार दिनांक-१५/०३/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता रोटरी क्लब हॉल गंजमाळ नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून. या कार्यक्रमासाठी मा .सौ. हिमगौरी आडके-आहेर (नूतन महापौर नाशिक मनपा) मा.सौ. संध्या मिलिंद खेडकर (प्राचार्या एस एमआरके महाविद्यालय नाशिक) मा. श्री डॉ. अमित केले(सुप्रसिद्ध सर्जन किमस मानवता हॉस्पिटल नाशिक) मा. डॉ. आशाताई पाटील (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा: ग्राहक रक्षक समिती)मा.सौ भारतीताई पवार(माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार) मा.सौ. जयश्रीताई थोरात(लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा शिर्डी नगरपरिषद) मा .अर्पणा वेलनकर(कार्यकारी संपादिका : दैनिक लोकमत. नाशिक) मा श्री अजय बोरस्ते(नगरसेवक तथा नाशिक महानगर प्रमुख शिवसेना) मा अश्विनी अत्रे(मिसेस इंडिया. दुबई) मा.प्रा. डॉ.सौ. शोभा सातभाई(लोकप्रिय साहित्यिक व समुपदेशक) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .तरी जास्तीत जास्त महिलांनी या दामिनी राष्ट्रीय भव्य आणि दिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहावे.  पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष: मा. महेंद्र देशपांडे यांचे जाहीर आव्हान.

1/5 - (1 vote)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे