Breaking
ब्रेकिंग

“मिशन ५० लिटर दुग्ध क्रांती” परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

0 0 6 5 0 7

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ आयोजित वसंत लॉन्स संगमनेर येथे आयोजित “मिशन ५० लिटर दुग्ध क्रांती” या परिषदेला उपस्थित राहून दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी समवेत व्यासपीठावर पंजाबचे श्री. दलजीतसिंग गिल, श्री. राजपालसिंग, श्री. सुखदेवसिंग व आदि उपस्थित होते.

संगमनेर तालुक्याचं दुधाशी असलेलं नातं हे केवळ व्यवसायाचं नाही, तर परंपरेचं आणि विश्वासाचं आहे. या परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे अधोरेखित झालं की, सहकाराच्या बळावरच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते.

राजहंस दुध संघाच्या प्रत्येक नेतृत्वाने आपल्या कार्यकाळात संघ उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. विशेषतः चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या काळात मुरघास, मुक्त संचार गोठा, नियमित दूध खरेदी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

आज काळाची गरज आहे, कमी जनावरांतून जास्त आणि दर्जेदार दूध उत्पादन करणे. “मिशन ५० लिटर” ही केवळ योजना नसून प्रत्येक दूध उत्पादकासाठी दिशा आहे. चांगली जनावरं, स्वच्छ गोठा, योग्य संगोपन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेसळमुक्त, दर्जेदार दूध या गोष्टींवर भर देणं अत्यावश्यक आहे.

आपल्या संघाचं दूध इतकं विश्वासार्ह असावं की, ते लहान मुलांनाही निःसंकोचपणे देता आलं पाहिजे, हीच खरी दुग्ध क्रांती ठरेल. सहकाराच्या बळावरच आज खाजगी क्षेत्रालाही स्पर्धा करावी लागत आहे आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो आहे. त्यामुळे हा सहकार अधिक मजबूत करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे मिशन 50 लिटर ही मोहीम सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी राबवून तालुक्यात पुन्हा दुग्ध क्रांती घडवून आणूया.

अत्यंत सुंदर आणि दुध उत्पादक यांच्यासाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संघाचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे