Breaking
ब्रेकिंग

सामाजिक कार्यकर्ते मा. श्री महेश लोढा शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. श्री रंजीत गलांडे यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर.

0 0 4 2 4 0

राहाता (प्रतिनिधी) राहता शहरात श्री बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट वतीने सालाबाद प्रमाणे यंदाचा समाज रत्न राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक शेत्रात काम करणारे बिरोबा महाराज अनुयायी व बिरोबा महाराजांचे अनेक ठिकाणी मंदिर उभारून, समाजातील अनेक गरीब कुटुंबातील मुलांचे आधार देणारे महेश लोढा यांना देण्यात येणार आहे.तसेेच शिर्डी पोलीस स्टेशन येथील कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे साहेेब यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून शिर्डी व परीसरातील गुन्हेगारांवर कारवाई करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत पोलीस खात्याची जनमानसात प्रतिमा उंचावली. या पुण्यभुमीत गुन्हेगारांचा समुळ नायनाट करण्याचे काम हाती घेतले.अडचणीत असलेल्या कोणत्याही व्यक्ती,महीला भगिनीनी फोन करून मदत मागितल्यास शणाचा विलंब न करत मदत पुरविली.पोलीस निरीक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे.याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.वै.ह.भ.प.सजन यशवंत सदाफळ, वै.भाऊसाहेब सजन सदाफळ यांचे स्मरणार्थ उभारलेले जगदगुरू संत तुकाराम मंदिर 15 चारी येथे गुरुवार दि.5 मार्च 2026 रोजी संत तुकाराम महाराज बीज निमित्त आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बीज कीर्तन सेवा वैष्णव महाराज जाधव यांचे 10 ते 12 या वेळेत हरी कीर्तन संपन्न होईल. समाज रत्न पुरस्कार वितरण मा.माणिकराव आहेर, प्रांत अधिकारी, महसुल विभाग, प्रा. डॉक्टर जयंतराव गायकवाड जेष्ठ पत्रकार,श्री राजेंद्र आघाव ,आपण नेते यांचे हस्ते.होणार आहे.तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष ,विधिज्ञ रामनाथ सदाफळ यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे