श्री साईबाबांच्या चरणी दानशूर साई भक्तांकडून०८ लाख ४२ हजार ५२० रुपये किमतीचे सुंदर नक्षीकाम असलेल्या सोन्याचा हार अर्पण

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो साई भक्त देश विदेशातून शिर्डीत येत असतात तसेच लाखो साई भक्तांची श्री साईबाबांवर अफाट भक्ती व श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक वेगवेगळ्या प्रकारचे साईबाबांच्या झोळीत भरभरून वेगवेगळ्या प्रकारचे दान देत असतात. यातच आज १४ फेब्रुवारी२०२६ रोजी श्री धनराज रावसाहेब मुंडे रा. कोठारबन जि. बीड या दानशूर साई भक्ताने ५९ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. त्यावेळेस श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द केला. या सुवर्ण हाराची किंमत ०८ लाख ४२ हजार ५२० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार
दानशूर साई भक्त यांचा सत्कार करण्यात आला.




