Breaking
ब्रेकिंग

कुंभारी गावातील बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आढळला

0 0 4 2 4 0

कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावातून कुमारी अश्विनी नाना शेजवळ ही १७ वर्षाची मुलगी २६ जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती . सगळीकडे शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही . २८ जानेवारी रोजी सायंकाळी कुंभारी पुलाजवळ संबंधित
मुलीची शॉल
व चप्पल आढळून आली असता कोपरगाव तालुका पोलीस ,नगरपालिका , प्रशासन व बचाव पथकाच्या मदतीने गोदावरी पात्रात शोध मोहीम सुरू केली असता. अखेर शुक्रवार 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कुंभारी परिसरातील राघवेश्वर मंदिरा जवळ या मुलीचा दुर्दैवी मृतदेह आढळून आला मृत मुलीचे नाव अश्विनी नाना शेजवळ (वय १७ वर्ष)राहणार कुंभारी असे असून .मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियांसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी कोपरगाव तालुक्यात पसरली असता या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली. या
प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस सर्व बाबीचा सखोल तपास करत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुंभारी गावासह कोपरगाव परिसरात मोठी शोककळा पसरली असून ग्रामस्थकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले.

2/5 - (1 vote)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे