Breaking
ब्रेकिंग

शिर्डी येथे चैनस्नेचींग करणारा रेकॉर्ड वरील आरोपी अखिर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शनासाठी आलेले साई भक्त नवीन कुमार निगा रेड्डी राहणार कोना रेड्डी हे त्यांच्या कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनाकरिता आले असता .१५/०१/२०२६ रोजी पहाटेच्या सुमारास हे त्यांच्या पत्नीसह श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे दर्शन करून बाहेर आले असता . हॉटेल अलौकिक परिसरामध्ये मोटर सायकल वरील दोन अनोळखी इसमानी त्याचं आईचे गळ्यातील 5,60,000 रुपये किमतीचे दागिने यामध्ये सोन्याच्या 02 चैन एक मंगळसूत्र असे 112 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून होऊन गेलेले आहेत सदर घटनेबाबत शिडी पोलीस ठाणे गु.र.न.36/2026 भारती न्याय संहिता 2023 कलम 309(4),3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले आहे.
सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वरील गुन्हा उघडकीस आणणे कामी पो उपनिरीक्षक दीपक मेंढे पोलीस अमलदार राहुल द्वारके रोहित येमुल सुनील मालणकर बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांची पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणे कामी सूचना व मार्गदर्शन करून सुदर्शन पथक रवाना करण्यात आले होते वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपीचे माहिती संकलित करून आरोपीची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्य व गुप्त खबऱ्या मार्फत सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी विकास चव्हाण राहणार अशोक नगर तालुका श्रीरामपूर व त्याचे साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली सदर आरोपीचा शोध घेत असताना विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण 40 वर्षे रा. रेल्वे गेट जवळ अशोक नगर श्रीरामपूर मिळून आल्याने त्यांस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केले असता सदरचा गुन्ह्यामध्ये गणेश विजय चव्हाण राहणार श्रीरामपूर हा आरोपी याचे सह असल्याची कबुली तसेच गुन्ह्यातील काही मुद्देमाल हा राखी गणेश चव्हाण राहणार श्रीरामपूर फरार हिचे मार्फत विकला गेला अशी कबुली दिली गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत आरोपीकडे तपास करता त्याच्या ताब्यातून 1.00.000/रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड गुन्ह्याचे वेळी वापरलेली एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची यामा कंपनीची मोटरसायकल एम. एच. 17 डी. एच.2414 असा एकूण अडीच लाखाचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताब्यातील आरोपीने अशाप्रकारे अनेक गुन्हे केले आहेत त्यामध्ये अ. न .पोलीस स्टेशन गु .र.न.1 शिर्डी अहिल्यानगर 36/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4) 3 (5) 2 शिर्डी अहिल्यानगर 35/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309,(4)3(5) 3 शिर्डी अहिल्यानगर1033/2025 भारतीय न्याय संहिता2023 चे कलम 309(4)3(5) 4 शिर्डी अहिल्यानगर 10 11/2025 भारती न्याय संहिता2023 चे कलम 309 (4)3(5) 5 राहता अहिल्यानगर436/2025 भारतीय संहिता2023 चे कलम 309, (4)3(5)6 संगमनेर तालुका अहिल्यानगर 24/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4)3(5) 7 सिन्नर नाशिक 33/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) 3,(5) आरोपी विकास उर्फ राहुल मोराजी चव्हाण यांस पिरकनकरानाई तामिळनाडू येथील गु.र.न.800/2009 भा .द .वि. कलम 395 वगैरे मध्ये शिक्षा झालेल्या असून तो सन 2009 ते सन 2016 या कालावधीमध्ये शिक्षा भोगून तो बाहेर आलेला आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अमलदार यांनी केलेले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे