Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा संस्थान ला SML ISUZU कंपनीची अत्याधुनिक स्कूल बस देणगी स्वरूपात अर्पण

0 0 4 2 4 0


शिर्डी :
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी संचलित शैक्षणिक संकुलासाठी बेंगळुरू येथील साईभक्त श्री. सुमंत रेड्डी यांनी SML ISUZU कंपनीची अत्याधुनिक स्कूल बस देणगी स्वरूपात अर्पण केली आहे.
आज या नूतन वाहनाची देणगीदार साईभक्तांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात येऊन स्कूल बसची चावी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली.
यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ, मंदिर विभाग प्रमुख श्री. विष्णु थोरात यांच्यासह संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देणगीदार साईभक्त श्री. सुमंत रेड्डी यांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सत्कार केला. सदर स्कूल बसची किंमत सुमारे २५ लाख ३८ हजार ४०६ इतकी असून, ही बस संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे