श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या पोटातून तब्बल ४ किलोचा महाकाय ट्यूमर सर्जरी करून यशस्वीरित्या जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्याचे टीमने काढून मोठे वैद्यकीय यश संपादन केले. त्या टीमचे सर्वत्र कौतुक

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये एक अतिशय गुंतागुंतीची आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली दिनांक १३फेब्रुवारी २०२६ रोजी हॉस्पिटल मधील जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्याचे टीम ने रुग्णाच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाच्या महाकाय ट्यूमर सर्जरी करून यशस्वीरित्या काढून मोठे वैद्यकीय यश संपादन केले आहे. निकिता गायकवाड राहणार कोपरगाव वय २७ या रुग्णाला बाळंतपणानंतर गेल्या काही दिवसापासून पोटात तीव्र वेदना व सूज जाणवत होती. तपासण्याकरिता श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांच्याकडे आले असता तपासणीनंतर त्यांच्या पोटामध्ये मोठ्या आकाराचा ट्यूमर
असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ डॉ. निहार जोशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री साईबाबा हॉस्पिटल मधील वैद्यकीय टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली. शस्त्रक्रियेमध्ये श्रद्धा सबुरी आणि शस्त्र कौशल्याची सांगड झाल्याचे दिसून येत असून सध्या रुग्णाची प्रकृती पूर्णतः स्थिर असल्याकारणाने व समाधान कारकरीत्या सुधारल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नुकताच डिस्चार्ज दिला. आधुनिक तंत्रामुळे शस्त्रक्रिया कमी वेदनादायक कमी रक्तस्त्रावाची आणि जलद पुनर्वसनाची ठरली आहे. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अनुभव डॉक्टरांमुळे परिसरातील रुग्णांना मोठा आधार व दिलासा मिळत आहे .रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले असून. डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे भुलतज्ञ डॉ. निहार जोशी व सर्जरी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर साहेब यांनी कौतुक केले ह्या कामगिरीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी श्री साईबाबा हॉस्पिटलतील सर्व डॉक्टर टीमचे आभार मानले.



