ब्रेकिंग
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्यदिवशी श्री साईचरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी) श्री गुरुपूर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शिवाजी कचरे यांनी विणा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे व खरेदी व्यवस्थापक श्री कुणाल आभाळे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी प्रशासकिय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख श्री विष्णु थोरात, संरक्षण अधिकारी श्री रोहिदास माळी, प्र.जनसंपर्क अधिकारी श्री दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
1
3
5
8
0



