Breaking
ब्रेकिंग

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देऊन समाजाचे आणि देशाचे उज्वल भविष्य घडवणाऱ्या गुरुजनांचा सन्मान हा शिर्डी शहरासाठी अभिमानाचा क्षण: नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात

0 1 3 5 8 0

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून शिर्डीत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा

शिर्डी(प्रतिनिधी) शिर्डी नगरपरिषदेच्यालोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून २६ वर्षाच्या इतिहासानंतर नगरपरिषदेत पहिल्यांदाच शिक्षक दिनानिमित्त शिर्डीतील सर्व शाळेतील शिक्षकांचा सन्मान, खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांच्या खास उपस्थित मोठ्या उत्सवात व आनंदी वातावरणात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिर्डीतील सर्व शाळेतील शिक्षकांना सन्मानपत्र शाल व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच साई युग न्यूज चे संपादक श्री भगवान थोरात यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी तसेच राष्ट्रीय लोकसेवा पत्रकार संघ जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते शिर्डी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात व सर्व सन्मानीय नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत श्री भगवान थोरात तसेच सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमळाकर कोते, सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक अमित शेळके, रवींद्र गोंदकर, निलेश दादा कोते, नगरसेविका सौ वैशालीताई कोते मुख्याध्यापक श्री शिवगजे सर, श्री वारुळे सर, श्री पाटील सर असे अनेक शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहराच्या विकासासाठी पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत आपणही खासदार निधीतून भरीव आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणार त्या प्रसंगी नगरसेवक , बापूसाहेब ठाकरे, सचिन गायकवाड सतीश गोंदकर, नितीन पाराजी कोते, अबुभाई शेख, नगरसेविका सौ छायाताई सुधीर शिंदे, सौ छायाताई पोपट शिंदे,सौ रेखाताई रणमाळे, वाल्मीक गोतीस, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोते, सामाजिक कार्यकर्ते कचेश्वर खंडीझोड, किरण बोरुडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वानंद रासने यांनी केले या कार्यक्रमाला अनेक शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे