ब्रेकिंग
श्री साईबाबा संस्थान ला देणगीरुपी दिली टाटा सिएरा गाडी

0
0
4
2
4
0
टाटा मोटर्स, पुणे रिजन येथील सर्व डिलर्स यांच्यावतीने आज ₹२५,६९,१९३/- (पंचवीस लाख एकोणसत्तर हजार एकशे त्र्याण्णव रुपये) किमतीची टाटा सिएरा ही चारचाकी गाडी श्री साईबाबा संस्थानकरिता देणगी स्वरूपात प्राप्त झाली.
या वाहनाची विधीवत पूजा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व टाटा मोटर्सच्या डिलर्स यांच्या हस्ते करण्यात येऊन वाहनाची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.
यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व डिलर्स यांचा सत्कार केला.
0
0
4
2
4
0




