ब्रेकिंग
पुणे येथील साई भक्त श्री रामदास तापकीर यांनी १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किमतीचे आकर्षक सोन्याचे ब्रोच श्री साई चरणी अर्पण

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी):श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. असेच महाराष्ट्रातील पुणे येथील साईभक्त श्री रामदास तापकीर यांनी १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचे ९० ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम केलेले सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्पण केले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते देणगीदार श्रीसाईभक्त श्री रामदास तापकीर यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



