Breaking
ब्रेकिंग

कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीचे डीलर साई सेवा मोटर्स यांच्यातर्फे ०९ लाख ५० हजार किमतीचे चार वाहने देणगीरुपी साईचरणी अर्पण

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो साई भक्त देश विदेशातून शिर्डीत येत असतात तसेच लाखो साई भक्तांची श्री साईबाबांवर अफाट भक्ती व श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक वेगवेगळ्या प्रकारचे साईबाबांच्या झोळीत भरभरून वेगवेगळ्या प्रकारचे दान देत असतात. यातच आज कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीचे ऑथोराईजड डीलर साई सेवा मोटर्स यांच्या वतीने साई टीव्हीएस कोपरगावचे संचालक वीरेंद्र भांडारकर व सौरभ लादगेकर यांच्या हस्ते०९ लाख ५० हजार रुपये किमतीचे चार वाहने देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आले यात TVS APACHE RTX 310,TVS NTORQ,150,TVS ORBITER (EV) व TVS 3 WHEELER CARGO अशा चार वाहनाचा समावेश आहे या वाहनाची विधिवत पूजन टीव्हीएस मोटर कंपनी प्रीमियम विभागाचे प्रमुख श्री विमल सुमली व श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले, अतुल वाघ कार्यकारी अभियंता श्री भिकन दाभाडे हे उपस्थित होते तसेच कंपनीच्या वतीने गोपाल सर मोहक द्वार साई टीव्हीएस कोपरगावचे संचालक श्री वीरेंद्र भांडारकर थ्री व्हीलर विभागाचे श्री सौरभ लादगेकर व विवेक दवे आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर श्री साई संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साई सेवा मोटर्स व टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे