श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी पायी पदयात्रा सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात पार पाडला

सप्तश्रृंगी गड (प्रतिनिधी)-श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी. शिर्डी ते वणी पायी पदयात्रा सोहळा .दि11/01/2026 ते 14 /1/ 2026 पर्यंत पायी पदयात्रा सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला संस्थेचे कर्मचारी वृंद हे सर्व मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने सप्तशृंगी गडावर पोचून सप्तशृंगी आईचे दर्शन मोठ्या भक्ती भावने घेतले प्रतीक गावोगावी प्रतिष्ठित व्यक्तींनी पायी पालखी सोहळ्याचे स्वागत करून देवीची आरती व सत्कार केला दिनांक.11,/01/2026 रोजी दर्डे फाटा मगरे वस्ती या ठिकाणी सकाळचा नाष्टा तसेच पायी पदयात्रा यांचा सत्कार करण्यात आला तसेच पालखीतर्फे मगरे सहकुटुंबाचा शाल श्री साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करून पदयत्री यांनी त्यांचे आभार मानले त्याच दिवशी संध्याकाळचा मुक्काम रुई (देवगाव) येथे श्रीराम कृष्ण हरी वारकरी आश्रम या ठिकाणी झाला आश्रम चे ह .भ .प. श्री माऊली शिंदे महाराज यांनी पालखी व पद यात्रेचे स्वागत केले संस्थेचे चेअरमन मा. श्री विठ्ठल पवार संचालक रामभाऊ गागरे सचिव विलास वाणी तसेच विजुभाऊ शिंदे यांनी संस्थेच्या पालखीला भेट देऊन ह .भ. प. श्री माऊली शिंदे महाराज यांचे हस्ते पालखीची आरती करण्यात आली तसेच मा. चेअरमन यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला पायी पालखीला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले तसेच बारा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी श्री गणेश कोल्हे उगाव यांनी पायी पालखीचे स्वागत व जेवणाची व्यवस्था केली. कोल्हे परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच पदयात्रेतर्फे कोल्हे परिवाराचा शाल बाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार केला तसेच त्याच दिवशी तिसगाव येथील ह .भ .प. महंत राकेश गिरी महाराज तसेच तेथील श्री मनोज शिरसाठ सौ मानसी शिरसाठ सर्व शिरसाट कुटुंबांनी पायी पालखीचे स्वागत करून त्यांच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली. शिरसाट कुटुंबाच्या हस्ते पालखीचे पूजा व आरती करण्यात आली पदयात्री तर्फे त्यांचा शाल श्रीफळ साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला संस्थेच्या पालखी सोहळ्याला गावोगावी प्रतिष्ठित भाविकांनी स्वागत करून मोलाचे सहकार्य केले . त्याबद्दल संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व संचालिका सचिव सहसचिव व कर्मचारी वृंद यांनी आभार मानले




