Breaking
ब्रेकिंग

श्री साईबाबा संस्थानचा जागतिक स्तरावर विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून गौरव सन्मान

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थान शिर्डी हे जागतिक देवस्थान असून या ठिकाणी लाखो साई भक्तांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुख सुखसोयी चांगले उत्कृष्ट प्रकारे सेवा उपलब्ध करत असते. हे अनुषंगाने श्री साईबाबा संस्थान चा जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करून श्री साईबाबा संस्थानला ऑनर सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले आहे. श्री साईबाबांच्या कृपेने व लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे अध्यक्ष व १८४ रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय डॉ.दीपक हरके यांच्या हस्ते ओनर सर्टिफिकेट श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे प्रदान केले. या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक सामाजिक व मानवसेवेतील योगदान आंधोरेखित झाले आहे भाविकांच्या सेवेसाठी श्री साईबाबा संस्थान सातत्याने सेवा करत असलेल्या कार्याला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे .यावेळी संस्थांनचे प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले. प्र. प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे