Breaking
ब्रेकिंग

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने श्री साई प्रसादालयास६९ लाख रुपये किमतीचे आत्याधुनिक डिश वाशिंग मशीन देणगी स्वरूपात साईचरणी अर्पण

0 1 3 5 8 0

ताशी ३ हजार डिश स्वच्छ करण्याची क्षमता;

शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना दर्जेदार व शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद भोजन उपलब्ध करून देणाऱ्या श्री साई प्रसादालयाच्या सुविधांमध्ये आणखी एका अत्याधुनिक यंत्राची भर पडली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने श्री साई प्रसादालयासाठी ६९ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देणगी स्वरूपात देण्यात आले आहे.
Winterhalter (विंटर हल्टर), जर्मनी या विदेशी कंपनीचे हे अत्याधुनिक मशीन श्री साईप्रसादालयात प्रसाद भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या डिश स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे. या मशीनची ताशी सुमारे ३,००० डिश स्वच्छ करण्याची क्षमता असून, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या डिश धुण्याच्या प्रक्रियेत यामुळे अधिक वेग, कार्यक्षमता आणि स्वच्छता साध्य होणार आहे.
या अत्याधुनिक मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री अतुल वाघ, प्रसादालय प्रमुख श्री संजय शिंदे, लाडू निर्मिती विभाग प्रमुख श्री रवींद्र गायके तसेच श्री साईप्रसादालयातील कर्मचारी उपस्थित होते.

3/5 - (1 vote)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे