Breaking
ब्रेकिंग

अपघातग्रस्त विमानातील सहा प्रवेशाचा मृत्यू डीजीसीएची माहिती

0 0 4 2 4 0

शिर्डी(प्रतिनिधी) आज सकाळी बारामती विमानतळा जवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे . डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामती मध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मदत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अपघात ग्रस्त ठिकाणी बारामतीकरांनी मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनेस्थळी दाखल होत असून. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला कमालीचा धक्का बसला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे