Breaking
ब्रेकिंग

आंध्र प्रदेशातील एलूरु येथील साई भक्त श्री एम श्रीनिवास राव यांनी श्री साईबाबांच्या चरणी सुमारे ८२ लाख३९ हजार २७१ रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण

0 1 3 5 8 0

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. याच भावनेतून गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या प्रथम दिनी आंध्र प्रदेशातील एलुरु येथील साईभक्त श्री. एम. श्रीनिवास राव यांनी श्री साईबाबांच्या चरणी ६२९ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.
या सुवर्ण मुकुटाची देणगी मुल्‍य सुमारे ८२ लाख ३९ हजार २७१ रुपये असून, भाविकांच्या श्रद्धा व भक्तीचे हे एक अनमोल प्रतीक आहे.
यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्री. एम. श्रीनिवास राव यांचा सत्कार करण्यात आला.

5/5 - (1 vote)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 3 5 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे