शहरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा समाजवादीचे आमरण उपोषण, मुख्याधिकारी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणला तात्पुरते स्थगिती.

श्रीरामपूर /शौकत भाई शेख
श्रीरामपूर
नगर पालिका पिण्याच्या पाणी नळाद्वारे दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा होत असलेबाबत समाजवादी पार्टी सह समस्त त्रस्त नागरीकांनी नगर पालिका मुक्तद्वार समोर आमरण उपोषण छेडले होते, यास
माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक समवेत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणी प्रतिष्ठित नागरीकांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला आपला पाठिंबा दर्शवला.परंतु सदरील प्रश्नी तात्काळ उचित कार्यवाही करण्यात येईल असे नगर पालिका मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्याने समाजवादी पार्टी चे उपोषण तात्पुरते स्वरुपात स्थगित करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने तातडीने यावर योग्य उपाययोजना राबविण्यात यावी तथा लेखी आश्वासनाची पुर्ती न झाल्यास समाजवादी पार्टी पुन्हा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशाराही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आला आहे.




