सावळीविहीर येथे त्रिनेत्रा इंटरप्राईजेस चे उद्घाटन मोठ्या उत्साहात….

शिर्डी प्रतिनिधी/-राहाता तालुक्यातील सावळीविहीर गावातील युवा उद्योजक प्रशांत सुनीलराव झुरळे यांनी जिद्द ,चिकाटी, व महेनतीच्या जोरावर गेल्या सहा ते सात वर्षांपासून ते त्रिनेत्रा इंटरप्राईजेस सीसीटीव्ही सेल्स आणि सर्व्हिस हा व्यवसाय करत आहे शिर्डी ,राहाता तालुक्यांसह पंचक्रोशीत तसेच कोपरगाव तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांनी आपल्या सावळविहीर गावांमध्ये आगलावे कॉम्प्लेक्स येथे नामांकित कंपनीचे CCTV चे सेल्स आणि सर्व्हिस चे भव्य असे शोरूम व डेमो सेक्शन उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला .यावेळी झुरळे म्हणाले दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची संख्या वाढत आहे सामान्य माणसाला असुरक्षिततेची जाणिव होते, व्यापारीवर्गाची चिंता वाढली आहे, दुकाने,शाळा,घरे, बंगला, शेतीचे उत्पन्न ,रस्ता, सुरक्षित वाटत नाही.गावात भयभीत वाटते.आता मनात भीतीचे सावट नको आता आम्ही चोरी ,टवाळखोर, अपघात, शाळकरी मुलांना होणारा त्रास, पंचक्रोशीतील सुरक्षिततेसाठी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी CCTV महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात घेऊन आपल्या सेवेत कटीबद्ध आहोत असे प्रशांत झुरळे यांनी सागितले तसेच आपल्या त्रिनेत्रा एंटरप्राइजेस शोरूमच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी
सावळीविहीर गावचे सरपंच ओमेश जपे , बाळासाहेब जपे ,शांताराम जपे, गणेश कापसे, गणेश आगलावे , भाऊसाहेब जपे , शांताराम जपे , विजय खरात,
राजेंद्र वाबळे, सचिन आगलावे, दत्तात्रेय आगलावे, नवनाथ जपे,
जीजाबा आगलावे , गायकवाड सर,शरद मुदगुल,
सदाशिव कापसे ,
किरण आगलावे. , चैतन्य कुलकर्णी , प्रशांत कोठारी , दिलिप कापसे ,भारत जपे व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



