श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिंडोरी प्रणित सर्व केंद्रावर श्री गुरुचरित्र पारायण अखंड नाम जप यज्ञ सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

शिर्डी ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त दिंडोरी प्रणित सर्व केंद्रांवर श्री गुरुचरित्र पारायण अखंड नाम जप यज्ञ सप्ताह 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या दरम्यान ग्राम देवता मानसन्मान मंडल स्थापना, अग्नी स्थापना, स्थापित देवता हवन, नित्यस्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग, चंडीयाग,स्वामी याग, गीताई याग, रुद्र याग-मल्हारी याग, शेवटच्या दिवशी बलि पूर्ण होते श्री दत्त पूजन व देवता विसर्जन सप्ताह सांगता होणार आहे आज सकाळी आठच्या आरती नंतर गुरुचरित्र पारायण सुरू झाले.साडेदहाच्या आरती नंतर आयुर्वेद शिबीर तपासणी व जुनाट आजाराविषयी माहिती, गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून आलेले डॉक्टर मोहन गौरकर आणि डॉक्टर उज्वल सिंग सोलंकी यांच्या हस्ते दीप प्रजनन करण्यात आले, जिल्हा प्रतिनिधी माणिक तात्या वडतेले, तालुका प्रतिनिधी बनकर काका, अर्चना शिंदे वैशाली शिंदे तसेच सेवकरी प्रतिनिधी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले,, त्यानंतर तपासणी नाडी परिक्षण शिबिराला सुरुवात झाली, पारायणास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित व पुरुषांची उपस्थिती दर्शवली आहे. श्री स्वामी समर्थ




