Breaking
ब्रेकिंग

शिर्डी पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी शिर्डीतून गहाळ झालेले 8 लाख 40 हजाराची 50 मोबाईल हस्तगत .

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या अपार श्रद्धेने लाखो साई भक्त मोठ्या भक्ती भावाने शिर्डीत जगभरातुन साईभक्त श्री साईबाबा समाधीचे दर्शनाकरीता शिर्डीमध्ये येत असतात. त्यामुळे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असते. शिर्डी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन महागड्या कंपनीची मोबाईल विविध ठिकाणाहुन गहाळ झालेले असून संबधित मोबाईल मालकांनी शिडी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन मिसिंग दाखल झालेल्या आहेत. त्यानंतर केंद्रसरकाने सुरु केलेल्या www.ceir.gov.in या वेबसाईटवर गहाळ मोबाईलची सविस्तर माहिती भरण्यात आलेली होती. सदर वेबसाईटच्या मदतीने शिर्डी शहरातुन गहाळ झालेले मोबाईल महाराष्ट्रासह विविध राज्यातुन ८ लाख ४० हजार रुपयाचे ५० मोबाईल हस्तगत केले असुन मुळ मालकांना संपर्क करुन मिळून आलेले मोबाईल परत केले आहेत.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे सो. मा. अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे सो. मा. अमोल भारती सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. शिर्डी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्री रणजित गलांडे सो., पोलीस निरीक्षक शिडर्डी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव व पोहेकॉ/३५३ संदिप उंदावत व शिर्डी पोलीस स्टेशन शोध पथक यांनी केलेली आहे.

शिर्डी पोलीस स्टेशन हददीतील व परिसरातील नागरीकांना शिर्डी पोलीस स्टेशन कडून आव्हान करण्यात येते की, मोबाईल गव्हाळ झाल्यानंतर संबधित पोलीस स्टेशनला संपर्क करुन मिसिंग दाखल करुन केंद्रसरकाने सुरु केलेल्या WWW.CEIR.GOV.IN या वेबसाईटवर माहिती भरावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे