Breaking
ब्रेकिंग

शिर्डी परिक्रमेत साईबाबांचा रथ ओढून सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य. डॉ. सुजय विखे पाटील

0 0 4 2 4 0

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीत साई परिक्रमा महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पाडला. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिडी नगरीत श्रद्धा भक्ती आणि सेवा भावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला ओम साई राम च्या अखंड जयघोषात आणि भक्तीच्या सागरात न्हाऊन निघालेल्या शिर्डीत यंदाचा साई परिक्रमा महोत्सव अत्यंत साईं नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात अनुभवायला मिळाला असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. साई परिक्रमा उत्सवाची सुरुवात पहाटे ५.३० वाजता खंडोबा मंदिर परिसरातून बाबांच्या रथाची आरती मान्यवरांच्या हस्ते झाली त्यानंतर परिक्रमेला पहाटेपासूनच साई नामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली होती परिक्रमेच्या मार्गावर ठिकठिकाणी भजन कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले . त्यामुळे भाविकांचा उत्साह अधिकच वाढल्याचे चित्र दिसून आले या परिक्रमेत रतलामचा सुवर्णथासह केरळ आणि इंदूरच्या पथकाचे मुख्य आकर्षण ठरले. सांस्कृतिक मेजवानी आणि भव्य शोभायात्रा यांच्या परिक्रमेचे मुख्य आकर्षण रतलाम येथील भव्य शोभायात्रा तसेच साईबाबांचा सुवर्ण रथ छत्र चामर ध्वज आणि पवित्र चादर सहभागी झाले होते याशिवाय कलाविष्कार इंदूर येथील तांडव नृत्य पथक केरळमधील पारंपारिक वाद्य पथक आणि डमरूपथक परिक्रमेचे विशेष लक्षवेधी ठरली. या प्रक्रियेत महिला विद्यार्थी शिक्षक सामाजिक संस्थेची प्रतिनिधी संत महंत , देश विदेशातून विविध राज्यातून आलेले साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .लाखो भाविकांची गर्दी असूनही कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन व शिडी ग्रामस्थ श्री साईबाबा संस्थान पोलीस प्रशासन व स्वयंसेवक यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता भाविकांच्या सोयीसाठी मार्गवर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी फराळ तसेच नाश्ता मोफत व्यवस्था करण्यात आली होती
या परिक्रमेवेळी डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी स्वतः साईबाबांचा रथ ओढत साईबाबा की जय च्या घोषणा दिल्या. त्यांच्या सहभागामुळे भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिर्डीच्या पावनभूमीत साई परिक्रमा महोत्सवाचे सातवे वर्षे यंदा अत्यंत दिमाखात साजरे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
डॉ. सुजय दादा विखे म्हणाले की साईबाबांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे परम भाग्य आहे साईबाबांचे प्रेम केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते जगभर पसरलेले आहे याची प्रचिती या परिक्रमेतून आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश विदेशातून मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीत दाखल झाले असे ते म्हणाले भावनिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या साई परिक्रमेत दोन लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवत साई चरणी नतमस्तक होत श्रद्धेची प्रचिती दिली
ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पारक व सर्व पदाधिकारी शिडी ग्रामस्थ श्री साईबाबा संस्थान. शिर्डी नगरपरिषद नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक व शिडी पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट प्रकारे नियोजन केले त्याबद्दल साई भक्तांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे