साईनगर रेल्वे स्टेशन येथे Durolt Fonzel कंपनीच्या डिजिटल लॉकरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे.
शिर्डी (प्रतिनिधी)साईनगर रेल्वे स्टेशन येथे डिजिटल लॉकर ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिर्डी रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या साई भक्तांच्या सुविधेसाठी Durolt Fonzel कंपनीच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरामध्ये लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आधुनिक आणि सुरक्षित लॉकर सुविधा उपलब्ध असून या लॉकर मध्ये आपले सामान ठेवुन दर्शनाला जाता येईल. आपले सामान या लोकांमध्ये सुरक्षित असून सीसीटीव्ही च्या मार्गदर्शनाखाली आहेत या कंपनीचे भारतामध्ये विविध ठिकाणच्या रेल्वे स्टेशन वरती त्यांच्या लोकल रेल्वे स्टेशनला सुविधा उपलब्ध आहेत या लॉकर चे उद्घाटन शिर्डी रेल्वे प्रबंधक रेल्वे प्रबोधन अनिल शुक्ला अनिल नागरे कंपनी डायरेक्टर सन्मुख सुंदरम सेल्स मॅनेजर तसेच रेल्वेचे विविध पदाधिकारी एच एल मीना आयपीएफ सौरभ झा सी एच आय अनिल तायडे आनंद मेढे सीबीएस आधी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते अनिश नागरे म्हणाले की आम्हाला साई भक्तांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत आनंद होत आहे आम्ही लवकरच शिर्डीमध्ये देखील लॉकर सुविधा उपलब्ध करू असे त्यांनी मत व्यक्त केले आहे.




