Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत संघर्ष स्पोर्ट्स संघाचे घवघवीत यश

0 0 4 2 4 0

राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत संघर्ष स्पोर्ट्स संघाचे घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाशी संलग्न महा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ५वी राज्यस्तरीय सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सीनियर शस्त्रांग मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ ही स्पर्धा ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ९ जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत संघर्ष स्पोर्ट्स मिक्स मार्शल आर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदकांवर आपले नाव कोरले.
🏅 वयोगट १० वर्षे
तन्मय धनंजय कदम – 🥇 सुवर्ण
काव्या विशाल गुळवे – 🥇 सुवर्ण
प्रेमाश सतीश सशेन – 🥇 सुवर्ण
🏅 वयोगट १४ वर्षे
आरती दिनकर झडे – 🥈 रौप्य
मंजुलिका आशिष हिवाळे – 🥇 सुवर्ण
अंजली सोमनाथ बोराडे – 🥈 रौप्य
श्रद्धा संजय वाडगे – 🥈 रौप्य
आराध्य दौलत कदम – 🥈 रौप्य
आनंद केशव सुराळकर – 🥈 रौप्य
आसद वशिम शेख – 🥇 सुवर्ण
शायबाज फिरोज शेख – 🥇 सुवर्ण
कृष्णराज सोमनाथ वाणी – 🥇 सुवर्ण
अभिजीत दीपक चकले – 🥇 सुवर्ण
🏅 वयोगट १७ वर्षे
शौर्यदीप विशाल गुळवे – 🥇 सुवर्ण
प्रेमाश सतीश सशेन – 🥇 सुवर्ण
सानिया मोमीन आझिम – 🥈 रौप्य
तृप्ती रमेश वाघ – 🥇 सुवर्ण
🏅 वयोगट २२ वर्षे
आलिशा मोहिनिराज खंडीझोङ – 🥇 सुवर्ण
अंजली अशोक कोल्हे – 🥇 सुवर्ण
जे विद्यार्थी सुवर्णपदक पटकावले आहे त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे
या राज्यस्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रथम क्रमांक मुंबई, द्वितीय क्रमांक सांगली तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्याने पटकावला. तसेच या सर्व खेळाडूंना संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन पवार सर तसेच सचिव अशोक शंकर शिंदे आणि शिक्षक रेश्मा शिंदे, प्रतिभा गायकवाड दीपक शिंदे तृप्ती वाघ या सर्वांचं मार्गदर्शन लाभले
ही स्पर्धा शस्त्रांग मार्शल आर्ट इंटरनॅशनल फेडरेशन (SMIF) व शस्त्रांग इंडियन मॉडर्न मार्शल आर्ट (SIMMA) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेचे अध्यक्ष ॲड. सोपान शेजवळ सर तर सचिव श्री. मिलिंदजी काटमोरे सर होते.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, संघर्ष स्पोर्ट्स संघटनेने राज्यपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे