पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करावी-श्रीरामपुरात मागणी

श्रीरामपूर तालुका/ (प्रतिनिधी): शौकत भाई शेख-
नगर शहरातील साम टीव्ही चे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला करून बेदम मारहाण करणाऱ्या ०६ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्यावतीने पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना पत्रकारांनी निवेदन दिले.यावेळी बोलतांना ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे म्हणाले की,जिल्ह्यातील पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत.सदर बाब अतिशय गंभीर असून सत्य असलेली घटनेची बाजू पत्रकार आपल्या वृत्तपत्र व टीव्ही,पोर्टलच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असतात.परंतु आपल्या विरोधात बातम्या आल्या तर गुन्हेगारी क्षेत्रातील लोक पत्रकारांना लक्ष करीत आहेत.
संपादक करण नवले म्हणाले की, पत्रकार श्री.थोरात यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेली मारहाण ही अतिशय निंदनीय आहे. त्यांना जाणून बुजून गुंड प्रवृत्ती व गुन्हेगार असलेल्या सहा लोकांनी बेदम मारहाण केलेली आहे. त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जय महाराष्ट्र टीव्हीचे जयेश सावंत यांनीही या घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी केली.
ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, नागेश सावंत, महेश रक्ताटे,प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, पद्माकर शिंपी,सचिन उघडे, जयेश सावंत, सलीम पठाण, राहुल मुथा, सुधीर लोळगे, अरुण पाटील, असलम बिनसाद, संतोष बनकर, पंकज कोठारी, नितीन चिते, रियाज पठाण आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————–
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर – 9561174111



