ब्रेकिंग
सोन्याचा मुलामा दिलेला१००ग्रॅम सोन्याचाशंख साई चरणी अर्पण

0
1
3
5
8
0
शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्रींच्या चरणी विविध प्रकारे दान अर्पण करीत असतात.
याच श्रद्धेपोटी तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील साईभक्त श्रीमती. जी. लक्ष्मी कांता यांनी श्री साईबाबांच्या चरणी १०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुलामा दिलेला शंख अर्पण केला. या शंखाची किंमत १३ लाख २७ हजार ९०० रुपये आहे. या दानशूर साई भक्ताचा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्रीमती.जी. लक्ष्मी कांता यांचा सत्कार करण्यात आला.
0
1
3
5
8
0



