अहिल्यानगर ची शान कुशल नेतृत्व युवकांचे प्रेरणास्थान मा.खा. श्री सुजय दादा विखे पा. यांची भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

शिर्डी ( प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या मोठ्या घडामोड घडत. भारतीय जनता पार्टीने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारणीची घोषणा केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्याची अभिमानाची बाब ठरवी अशी निवड. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध निवडणुकांमध्ये
राहता तालुक्याचे भाग्यविधाते पालकमंत्री नामदार मा. श्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मा. खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केले. या कामगिरीची दखल घेत श्री सुजय दादा विखे पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी श्री सुजय दादा विखे पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस , प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी श्रीसुजय दादा विखे पा
यांचे अभिनंदन केले. तसेच नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून गावोगावी मा. खा. सुजय दादा विखे पाटील यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.



