Breaking
महाराष्ट्र

शिर्डी नगरीच्या राजकारणाची सूत्रे आता लाडक्या बहिणींच्या हाती

0 0 4 2 4 0

शिर्डी नगरीच्या राजकारणाची सूत्रे आता लाडक्या बहिणींच्या हाती

संपादक भगवान थोरात

शिर्डी….श्री साईबाबांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या शिर्डीनगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अमूलग्र बदल झालेला दिसून येत असून या मतदार संघांमध्ये पुरुष मतदारा पेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे अवघ्या देशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी नगरपरिषदेची धुरा आता सक्षम आणि कार्यक्षम महिलेच्या हाती येणार यात शंका नाही.
मोठया कालावधी nantr😂शिर्डी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. या साठी प्रशासन लागलीच कामाला लागले आहे या संदर्भात शिर्डी नगर परिषदेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली यात निवडणूक अधिकारी माणिकराव आहेर यांनी सविस्तर माहिती दिली 10 नोव्हेंबर 25 पासून फार्म भरण्यास सुरुवात झाली असून फार्म भरण्याची शेवटची मुदत 17 नोव्हेंबर 25 पर्यंत आहे. शिर्डी शहरात एकूण 33613 मतदार असून पुरुष मतदार संख्या 16797 असून महिलांची संख्या मात्र 16816 इतकी आहे म्हणजे एकूण 23जागा पैकी 12 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत त्याचप्रमाणे दुबार मतदारांची संख्याही 300 च्या जवळपास आहे. प्रत्येक मतदारांना मतदान स्लिप देण्यात येणार आहे. एकूण 10 प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्तीला 3मते तर प्रभाग 11 मध्ये प्रत्येक व्यक्तीला 4 मते द्यावी लागणार आहे असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिघे यांनी स्पष्ट केले आहे.
पत्रकार परिषदेला शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे, निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर, प्रभारी मुख्याधिकारी प्रियांका वानखेडे, नायब तहसीलदार बाबासाहेब मुळे आदी उपस्थित होते.

1/5 - (2 votes)

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे