डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
शिर्डी प्रतिनिधी… शिर्डी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आनंद बौद्ध विहार येथे भीमसैनिकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अँड,अनिल शेजवळ, जयश्रीताई थोरात, राहुल भडांगे, अँड.अविनाश शेजवळ, किशोर चव्हाण सर, नानाभाऊ त्रिभुवन बौद्धाचार्य खंडिझोड, वीर, सुनीता कोळगे भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व पदाधिकारी उपासक उपासिका सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बौद्धाचार्य खंडिझोड आणि विर यांनी बौद्ध वंदना चे वाचन व पठण करून छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी रमाई मित्र मंडळ व सरकार फाउंडेशन च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अँड अनिल शेजवळ,राहुल भडांगे सह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर चव्हाण सर यांनी केली.
