ब्रेकिंग
दीपावली उत्सव निमित्त साई संस्थान झाले सज्ज

0
1
4
9
7
0
शिर्डी : दीपावली उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या मंगलमय प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते द्वारकामाई मंदिरासमोर दीपप्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दीपांच्या प्रकाशाने द्वारकामाई परिसर उजळून निघाला. दीपावलीचा आनंद, उत्साह आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला.
0
1
4
9
7
0



