२५०० लेकीला मायेने पाखर घालणारी माय माऊली सुमित्रा काकी काळाच्या पडद्या आड

शिर्डी (प्रतिनिधी)शिर्डी नगरपंचायती च्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा तसेच २५०० मुलींना मायेची पाखर घालणारी तसेच महिलांच्या आडी अडचणीसाठी धावणाऱ्या सामाजिक धार्मिक कार्याला कायमस्वरूपी झटणारी माय माऊली सुमित्रा (काकी) कैलास कोते पाटील यांच्या निधनाने राहता तालुका पंचक्रोशीत शोककळा पसरली. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत माळवली. हजारो नागरिकांच्या व प्रतिष्ठित धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साई आश्रम क्रमांक एकच्या मागील पारगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र योगीराज व धनराज यांनी त्या मातेला अग्नी दिला. यावेळी उपस्थित जनसमूहाला अश्रू अनावर झाले. अंतिम दर्शनासाठी सकाळपासूनच कैलास बापू कोते यांच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व स्तरातील महिला व नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. सुमित्रा काकी यांचे संपूर्ण जीवन सामाजिक बांधिलकीचे उदाहरण होते. स्वतःच्या घरात मुलगी नसल्यांची खंत बाजूला ठेवून त्यांनी समाजातील मुलींना आपले मानले सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अडीच हजारांहून अधिक सर्व धर्माच्या गरीब व गरजू मुला मुलीचे विवाह लावून त्यांचे आईप्रमाणे संसार उभे केले त्यामुळे त्या गरीब व गरजू कुटुंबासाठी मायेचा आधार बनल्या होत्या. शिर्डीच्या नगराध्यक्षा म्हणून दोन वेळा त्यांनी शहराचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात शिर्डी शहराच्या विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध विकास कामे मार्गी लावली. श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळून कर्मचाऱ्यांचे प्रश्न व साई भक्तांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्या बरोबरच परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी मिळून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन अनेक तरुणांना रोजी रोटी मिळवून दिली. अशा या माऊली च्या अंत्यसंस्कारालामाजी. मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के मा.खा. श्री सुजय दादा विखे. खा. श्री भाऊसाहेब वाकचौरे संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, भाजपचे नेते श्री राजेंद्र पिपाडा, शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, राहता नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, शिर्डी उपनगराध्यक्ष श्री अभय भैया शेळके, यांच्यासह अनेक सर्वपक्षीय पदाधिकारी आजी – माजी नगरसेवक व नगरसेविका आणि हजारो नागरिक व मान्यवर उपस्थित राहून सुमित्रा काकींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




