श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्यावतीने श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री लक्ष्मीपूजन कार्यक्रमाचेआयोजन

शिर्डी, – दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मी पूजन २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीचे श्रीलक्ष्मी पूजन दि. ०८ नोव्हेंबर २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने संपन्न होणार आहे. पूजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे –
🔸 सायं. ०४.३० वा. – श्री साईबाबांच्या दर्शनासाठीची रांग तात्पुरती बंद राहील.
🔸 सायं. ०४.३० ते ०५.०० वा. – पूजनाची तयारी केली जाईल.
🔸 सायं. ०५.०० ते ०५.५५ वा. – श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मी पूजन पार पडेल.
🔸 सायं. ०६.०० वा. – श्रींची धुपारती होईल.
या पवित्र प्रसंगी श्री साईबाबांच्या भक्तांनी आपले दर्शन नियोजन व वेळा लक्षात घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच पूजन कार्यक्रमादरम्यान संस्थान प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.



