Breaking
ब्रेकिंग

गोदावरी वसाहत व राहाता येथील 340 घरांना ‘जैसे थे’ प्रमाणे उतारे मिळणार : आजारी असतानाही . भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री सुजय दादा विखे पाटील आले नागरिकांच्या भेटीला

0 1 4 8 7 1

राहाता (प्रतिनिधी): अमानवीय अफवांमुळे त्रस्त झालेल्या गोदावरी वसाहत, साकुरी व राहाता येथील 340 घरांना ‘जैसे थे’ प्रमाणे उतारे देण्यात येतील, अशी मोठी घोषणा लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी आज केली.

खासदार सुजय विखे पाटील हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र या गोरगरीब नागरिकांना धीर देण्यासाठी, त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांनी डॉक्टरांची दोन तासांची परवानगी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, राहाता येथे सायंकाळी झालेल्या बैठकीला हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या अफवांमुळे वसाहतीतील गोरगरीब नागरिक, महिला, वयस्कर आजी व विधवा भयभीत झाल्या होत्या. ‘आता आपले कसे होईल, कुठे जायचे’ या चिंतेने अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते.

यावेळी खा. सुजयदादा विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, येथील सर्व रहिवाशांना ‘जैसे थे’ स्थितीत उतारे दिले जातील. तसेच रस्ते, पाणी, शाळा व इतर सर्व जीवनावश्यक सुविधा देखील पुरवल्या जातील.

त्याचप्रमाणे येथील गुन्हेगारी व दादागिरी पूर्णपणे मोडून काढण्यात येईल. महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्यांना त्याच्याच घरात जेसीबीने गाडण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उतारे मिळाल्यावर प्रत्येकाने आपापल्या परीने आपले घर चांगल्या पद्धतीने बांधावे. पुढील सर्व गरजा पूर्ण करण्यास दादा बांधील आहे, असेही खा. विखे पाटील म्हणाले.

या निर्णयाची घोषणा होताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला व ‘दादांच्या’ नावाने घोषणा दिल्या. आजारपणातही दादा आपल्यासाठी आले हे पाहून अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
यावेळी राहाता शहराचे लोकनोयुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर,मुकुंदनाना सदाफळ,साकुरी चे सरपंच संदीपभाऊ दंडवते,आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप ( पप्पू भाऊ ) बनसोडे,नगरसेवक समाजसेवक दशरथभाऊ तुपे,सतीश बावके,दिपक शिदे,दिपक दंडवते,झुंबर शिंदे,सलमान पठाण,फिरोज पठाण,मनोज डुकरे,रावसाहेब बनसोडे इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे