Breaking
ब्रेकिंग

०१मे कामगार दिनानिमित्त श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को. ऑप सोसायटीचे चेअरमन मा. श्री विठ्ठल पवार व व्हॉइस चेअरमन पोपटराव कोते तसेच सर्व संचालक मंडळ यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दिली मोठी अनोखी भेट

0 1 4 8 7 1
  • शिर्डी (प्रतिनिधी) श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटी लि शिर्डी च्या कायम कर्मचाऱ्यांना कामगार दिनानिमित्त २५ वर्ष सेवा झालेल्या४७ कर्मचाऱ्यांना ७ वे वेतन आयोगाप्रमाणे बेसिक लागू करून सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी मेडिकल अलाउन्स एकूण ५०० रुपये करण्यात आला तसेच किमान वेतनधारकांना एकूण ५०० रुपये अंतरिम वाढ देण्यात आली तसेच या कर्मचाऱ्यांना संस्थेमार्फत कर्ज वाटप चालू करण्यात आले आहे.३३ कंत्राटी कर्मचारी यांना संस्थेत फिक्स पे वेतनावर घेण्यात आले संस्थेने सभासदाप्रमाणेच कर्मचाऱ्यांचाही१० लाख रुपये नैसर्गिक विमा उतरविला असून संस्थेचे कर्मचारी कै. श्रीमंत गोविंद पाटील यांच्या वारसांना१० लाख नैसर्गिक विमा रक्कम अदा करण्यात आले .तसेच संस्थेच्या सेवा नियम अनुकंपा नियमाप्रमाणे कै. श्रीमंत गोविंद पाटील यांचे वारस श्रीमती शितल श्रीमंत पाटील यांना फिक्स पे वेतनावर संस्थेच्या सेवेत समाविष्ट करण्यात आले. संस्थेच्या १२९ सर्व कायम कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी नियमाप्रमाणे लागू करण्यात आली संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून विद्यमान संचालक मंडळाने कर्मचाऱ्याचे प्रश्न मार्गी लावल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तसेच विद्यमान संस्थेचे चेअरमन मा श्री विठ्ठल पवार व व्हाईस चेअरमन मा श्री पोपटराव कोते व सर्व संचालक मंडळांनी कामगार दिनानिमित्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांना एक अनोखी भेट दिली त्याची कृतज्ञ म्हणून
    संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने संस्थेचे विद्यमान चेअरमन मा श्री विठ्ठल पवार व व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा श्री विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन मा श्री पोपटराव कोते संचालक श्री महादू कांदळकर श्री मिलिंद दुनबळे श्री रवींद्र गायकवाड श्री देविदास जगताप श्री कृष्णा आरणे श्री विनोद कोते श्री तुळशीराम पवार श्री भाऊसाहेब लवांडे श्री भाऊसाहेब कोकाटे श्री इकबाल तांबोळी श्री रंभाजी गागरे श्री संभाजी तुरकणे तज्ञ संचालक श्री भाऊसाहेब लबडे तसेच शांती निवास निवासस्थानाचे अधीक्षक मा श्री मिरजकर साहेब तसेच संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन श्री संदीप भाऊ बनसोडे तसेच संस्थेचे सभासद सावंत साहेब संस्थेच्या संचालिका सौ सुनंदा जगताप सौ लता बारसे तसेच संस्थेचे सचिव श्री विलास वाणी सहसचिव श्री बाबासाहेब अनार्थ श्री संभाजी कोते असे अनेक सभासद व संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे