Breaking
ब्रेकिंग

गवारे मामा फौंडेशनच्या अध्यक्षपदी पांडे तर उपाध्यक्षपदी बोरावके यांची नियुक्ती…..

0 0 6 5 1 0

*कोपरगाव -(प्रतिनिधी) येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या गवारे मामा फौडेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध व्यापारी फुलचंदजी पांडे यांची व या बरोबरच उपाध्यक्ष म्हणून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हेमंत बोरावके यांची पण एकमताने निवड झाली. विश्वस्त पदाच्या एका रिक्त जागी प्रसिद्ध ऑडिटर दत्तात्रय खेमनर साहेब यांची निवड करण्यात आली.*
*या निवडी नंतर फौडेशन कार्यालयात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व फौंडेशनचे संस्थापक सचिव पुरुषोत्तम पगारे यांच्या हस्ते अध्यक्ष फुलचंदजी पांडे व उपाध्यक्ष हेमंत बोरावके यांचा पुष्पगुच्छ व शाल देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्रीम. लतिकाताई जोशी व सौ. ज्योत्स्ना पगारे या उपस्थित होत्या.*
*गवारे मामा फौडेशनच्या वतिने कोपरगाव शहरात तळागाळातील शालाबाह्य मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी रात्र शाळेच्या माध्यमातून गेल्या ३३ वर्षापासून कार्य सुरू आहे. त्याज बरोबर परित्यक्ता स्रियांचे प्रश्न सोडविणे, फौडेशन सभागृहात विविध आरोग्य विषयक शिबीरांचे आयोजन केले जाते. सर्वसामान्य माणसांच्या मुला मुलीच्या साखरपुडा व विवाहासाठी सहकार्य केले जाते.*
*मा.फुलचदंजी पांडे व मा. हेमंत बोरावके यांच्या निवडी बाबत अनेकांनी अभिनंदन केले.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे