Breaking
ब्रेकिंग

‘सेवा संकल्प अभियान’ च्या माध्यमातून आदिवासी बांधवापर्यंत योजनाचा लाभ पोहोचवा: आमदार डॉ. किरण लहामटे

0 1 4 8 7 1

*अकोले तालुक्यात अभियानाचा उत्साहात शुभारंभ*

अहिल्यानगर (प्रतिनिधी) (जिमाका) : आदिवासी समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना व सेवा पोहोचवून त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबवावे. जास्तीत जास्त आदिवासी नागरिकांपर्यंत पोहोचून आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिल्या.
अकोले तालुक्यातील चिंचोडी येथे ‘सेवा संकल्प अभियान’ उपक्रमाचा शुभारंभ आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, चिंचोडीच्या सरपंच श्रीमती कविता मधे, गट विकास अधिकारी अमर माने, महिला व बालविकास अधिकारी केदार नांगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शामकांत शेटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी प्रास्ताविकातून ‘सेवा संकल्प अभियान’ दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते अभियानाच्या चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.
अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती देण्यासोबतच आवश्यक कागदपत्रे व दाखले उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा देण्यात आल्या. दिवसभरात 25 आधार कार्ड दुरुस्ती, 2 उत्पन्न दाखले, 28 रहिवासी दाखले आणि 110 जातीचे दाखले देण्यात आले. तसेच वन हक्काबाबत जनजागृती, आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य तपासणी आणि आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विवाह नोंदणी व उत्पन्न दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कातकरी समाजातील बांधवांचा सत्कार करण्यात आला.
अभियानाच्या ठिकाणी विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती घेतली आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध योजना आणि सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘सेवा संकल्प अभियान’ महत्त्वपूर्ण ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे