Breaking
ब्रेकिंग

श्री साई संस्थान सोसायटीच्या डिजिटल लॉकरची सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आव्हान केलेल्या डिजिटल इंडियाला बळकटी देणारी-मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर

0 1 4 8 7 1

शिर्डीत डिजिटल मोबाईल लॉकर सुविधेचा शुभारंभ!

शिर्डी (प्रतिनिधी) : श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शिर्डी यांच्या वतीने साईभक्तांच्या सुविधेसाठी नव्या युगातील डिजिटल मोबाईल लॉकर सुविधेचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

ही सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेला बळकटी देणारी ठरेल, असे मत श्री. गाडीलकर यांनी व्यक्त केले. भाविकांचे महागडे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी सोसायटीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले. तर भाविकांसाठी सुरू झालेली ही सुविधा दिवाळीची गोड भेट असल्याचे उपनगराध्यक्ष श्री. अभय भैय्या शेळके यांनी नमूद केले.

यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष श्री. अभय शेळके, संस्थानच्या संरक्षण विभागाचे श्री. माळी साहेब, सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल पवार, संचालक रामभाऊ गागरे, श्री. मिलिंद दुनबळे, श्री. देविदास जगताप, श्री. कृष्णा आरणे, सचिव श्री. विलास वाणी यांच्यासह संचालक, पदाधिकारी, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे