सावळी विहीर (सिद्धार्थ नगर)येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

सावळीविहीर(प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंतीनिमित्त सिद्धार्थ तरुण मंडळ व श्री साईनाथ हॉस्पिटल शिर्डी यांच्या सहकार्याने सकाळी ०९ ते ०१ ह्या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सिद्धार्थ नगर मधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले त्याप्रसंगी श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को. सोसायटी शिर्डीचे संचालक मा. श्री रवींद्र गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन म्हस्के उपाध्यक्ष दीपक लिहिणार, सिद्धार्थ बनकर दीपक बनकर अभय भालके अनिल बनकर सागर त्रिभुवन पार्थ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले .तसेच या शिबिरासाठी श्री साईनाथ हॉस्पिटलचे डॉ. श्री भारती सर, टेक्निशियन श्री क्षिरसागर सर, श्री लुटे सर श्री आवळेकर सर, सिस्टर लीना गमे मॅडम, श्री शशिकांत गायकवाड श्री अमोल देवकर श्री निलेश मोरे यांनी रक्तदान शिबिर साठी मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल सिद्धार्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी सदस्य तसेच संस्थेचे संचालक मा. श्री रवींद्र गायकवाड यांनी त्यांचे आभार मानले. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल अनेक स्तरांतून कौतुक व शुभेच्छा देण्यात आल्या.




