श्री साईबाबा हॉस्पिटल ला कॅनरा बँकेकडून ३५ लाख किमतीचे व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात दान

शिर्डी : (प्रतिनिधी) देश विदेशातील लाखो भाविकांची श्री साईबाबांवर अढळ श्रद्धा असून भाविक मोठ्या भक्ती भावाने श्रीच्या चरणी विविध स्वरूपात उदंड दान अर्पण करत असतात याच श्रद्धेपोटी आज श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलला कॅनरा बँकेच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत सुमारे ३५ लाख रुपये किंमतीचे दोन अत्याधुनिक व्हेंटिलेटर श्री साई संस्थानला प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची क्षमता अधिक बळकट होणार असून गंभीर रुग्णांच्या उपचारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे, कॅनरा बँकेचे मुख्य हेड ऑफिसर श्री प्रमोद कुमार सिंग, रिजनल ऑफिसर श्रीअनिल कुमार, नागपूर रिजनचे सुरेंद्र भाऊ, मॅनेजर श्री उमेश शेटे व श्री चंद्रशेखर सोनी वैद्यकीय संचालक डॉक्टर श्री प्रीतम वडगावे सहाय्यक आदी सेविका मंदा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कॅनरा बँकेने दिलेल्या व्हेंटिलेटरमुळे श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये रुग्णसेवा अधिक सक्षम होणार असून श्री साईबाबांच्या सेवाभावी परंपरेला बळ मिळणार आहे असे प्रतिपादन करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कॅनरा बँक च्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करून कॅनरा बँके च्या सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानले यावेळी श्री साईबाबा हॉस्पिटलचे डॉक्टर्स , हॉस्पिटलचे स्टॉफ व कर्मचारी वृंद तसेच कॅनरा बँकेचे अधिकारी ,पदाधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मा. श्री सुरेश टोलमारे यांनी केले. तसेच कॅनरा बँकेचे प्रदर्शन मॅनेजर मा. श्री उमेश शेटे यांनी आभार मानले




