श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईबाबांच्या फोटो, पोथी व विनाची मोठ्या उत्साहात साई नामाच्या गजरात मिरवणूक

शिर्डी ( प्रतिनिधी) श्री रामनवमी उत्सवानिमित्त लाखो साई भक्त पायी दिंडी पालखी सोहळ्यात तसेच अनेक साई भक्त मोठ्या भक्ती भावाने साई नामाच्या गजराने शिर्डीत दाखल झाले संपूर्ण शिर्डी शहर साईबाबांच्या जयजयकाराने दुमदुमून गेले शिर्डी परिसरात विद्युत रोषणाई उत्कृष्ट प्रकारे करण्यात आली .आज श्री श्रीरामनवमी उत्सवाचा मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांच्या फोटो, पोथी व विणाची मिरवणूक मोठ्या उत्साहात व साई नामाच्या गजरात आनंदमय वातावरणात काढण्यात आली. त्याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मा. श्री शिवाजीराव कचरे यांनी विणा, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी तर श्री साई संस्थान चे उपकार्यकारी अधिकारी मा. श्री भीमराज दराडे व वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल मा. श्री शैलेश ओक यांनी फोटो घेऊन सहभाग घेतला यावेळी प्रशासकीय अधिकारी मा. श्री संदीप कुमार भोसले तसेच मंदिर प्रमुख मा. विष्णुपंत थोरात, संरक्षण अधिकारी मा. श्री रोहिदास माळी जनसंपर्क अधिकारी मा. श्री दीपक लोखंडे तसेच मंदिर पुजारी व शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




