डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जन्मोत्सव सोहळा समिती व राजवाडा प्रतिष्ठान भीम जन्मोत्सव सोहळ्यासाठी सज्ज

शिर्डी (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५वी जयंती महोउत्सव सार्वजनिक उत्सव समिती भिम नगर शिर्डी पालकमंत्री मा. श्री राधाकृष्ण विखे पा. भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री सुजय दादा विखे पा. यांच्या शुभ हस्ते तसेच मा. श्री सचिन भाऊ गायकवाड नगरसेवक शिर्डी नगरपरिषद मा .श्री नितीन भाऊ धिवर सामाजिक कार्यकर्ता राजवाडा प्रतिष्ठान यांच्या कुशल मार्गदर्शनाखालीभीम जन्मोत्सव सोहळ्याचे कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक-१२/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०६ वा. (बिग बॉस फेम) दिव्या शिंदे (सरकार) यांचा व्याख्यानाचा तसेच धाडसी रमाईचा इतिहास सांगणारे माता रमाई भारतातील पहिले एकपात्री नाटक अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्या अभियानातून तसेच दिनांक १३/०४/२०२६ रोजी संध्याकाळी ०६ वा. मोठ्या जल्लोसात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मंजुषा ताई शिंदे यांचा भीम गीताचा कार्यक्रम तसेच दिनांक १४/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०५ वा. पाच वाजता भव्य व दिव्य असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सोहळा भीम नगर मधून निघणार आहे. भीम जन्मोत्सव सोहळा मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पा. तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा.श्री सुजय दादा विखे पा. यांच्या शुभहस्ते तसेच प्रथम नगराध्यक्ष मा. श्री कैलास बापू कोते लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात उपनगराध्यक्ष मा. श्री अभय भैया शेळके मा. श्री अमोल भारती उपविभाग अधिकारी शिर्डी मा. श्री रंजीत गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी मा. श्री सतीश दिघे मुख्याधिकारी शिर्डी नगरपरिषद मा .श्री महेश यशेकर उपनिरीक्षक शिर्डी मा .श्री संदीप भाऊ सोनवणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मा .श्री. नितीन दादा शेळके मा.नगरसेवक शिर्डी मा . सौ. प्रतीक्षा किरण कोते पा. गट नेता शिर्डी नगरपरिषद मा .श्री अरविंद अप्पा कोते बांधकाम सभापती शिर्डी नगरपरिषद मा .सौ कोमल किरण बोराडे पाणी पुरवठा सभापती शिर्डी नगरपरिषद मा. श्री. दीपक भाऊ गोंदकर आरोग्य सभापती शिर्डी नगरपरिषद मा. सौ . सुनिता वसंत गोंदकर महिला व बालकल्याण सभापती शिर्डी नगरपरिषद यांच्या प्रमुख अतिथी तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक मा.श्री सचिन भाऊ गायकवाड नगरसेवक शिर्डी नगर परिषद तसेच मा. श्री. नितीन भाऊ धिवर सामाजिक कार्यकर्ते राजवाडा प्रतिष्ठान शिर्डी तसेच समितीचे अध्यक्ष मा .श्री. कचेश्वर भिका शेजवळ उपाध्यक्ष मा. श्री संदीप विलास शेजवळ तसेच सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व बांधवांनी वरील कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान समितीतर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे ठिकाण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय भवन भिम नगर शिर्डी





