श्री साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकडून श्री साईबाबांच्या चरणी सुमारे ०३ लाख ३५ हजार किमतीचे गावरान हरभरा अर्पण.

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शनासाठी देश-विदेशातील लाखो साई भक्त शिर्डीला येत असतात. श्री साईबाबांवर भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक मोठ्या भक्ती भावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपात उदंड दान अर्पण करत असतात. याच श्रद्धेपोटी शिर्डीतील रहिवासी तसेच श्री साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी साई भक्त श्री विलास सोपान कोते पा. यांनी श्री साईबाबांच्या चरणी ७० पोती गावरान हरभरा अर्पण केले या हरभऱ्याची किंमत सुमारे ३ लाख ३५ हजार रुपये इतकी असून या हरभऱ्याचा उपयोग संस्थानच्या साईप्रसादालयात भाविकांना प्रसाद रूपाने देण्यात येणाऱ्या भोजनातील भाजीसाठी करण्यात येणार आहे. या साई भक्ताचा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीतर्फे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




