Breaking
ब्रेकिंग

पेढा प्रसादाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, शिर्डीत नमुने तपासणीसाठी जप्त

0 1 4 8 7 2

शिर्डी (प्रतिनिधी):
साईबाबा मंदिर परिसरात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पेढा प्रसादाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने शिर्डीत धडक कारवाई सुरू केली आहे. भाविकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ नये, यासाठी विविध प्रसाद विक्री केंद्रांवर तपासणी करण्यात येत असून प्रसादाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही भाविकांनी प्रसादाच्या दर्जाबाबत आक्षेप घेत संबंधित विभागाकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शिर्डीतील विविध प्रसाद विक्री केंद्रांवर छापे टाकून तपासणी केली. तपासणीदरम्यान पेढ्यांचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विक्रेते किंवा उत्पादक दोषी आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिर्डीत दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असल्याने प्रसादाच्या गुणवत्तेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. त्यामुळे प्रसाद उत्पादन, साठवणूक आणि विक्री प्रक्रियेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे प्रसाद विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, प्रयोगशाळेचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतरच प्रसाद निकृष्ट असल्याबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे