सिद्धार्थनगर मध्ये तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी
सावळीविहीर (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा शाखा सिद्धार्थ नगर यांच्यावतीने शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५७०वीजयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली तसेच भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थ नगर शाखाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अहिल्यानगर उत्तर जिल्हा अध्यक्ष मा श्री शांताराम रणशूर जिल्हा उपाध्यक्ष श्री गौतम पगारे तालुका अध्यक्ष श्री गौतम गोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलकाचा अनावरण करण्यात आले त्यावेळेस बौद्ध महासभा ग्राम शाखा पदाधिकारी सुमित गजरमल दीपक लिहिणार बबन मस्के अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपसरपंच बाळासाहेब जपे पा. यांनी तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने खिरदान व भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन श्री दीपक लिहिणार यांनी केले सूत्रसंचालन बबन मस्के यांनी केली यावेळी सिद्धार्थ बनकर राहुल मस्के राहुल लिहिणार अधिक मोरे ज्ञानेश्वर त्रिभुवन दीपक बनकर राहुल गायकवाड प्रथमेश लिहिणार अशी अनेक उपासक उपाशी का तसेच सिद्धार्थनगरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच गौतम बुद्ध जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.




