Breaking
ब्रेकिंग

पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पा. यांनी सायकलपट्टू प्रणिता सोमणेचे केले अभिनंदन

0 1 4 8 7 2

*ओडिशा राष्ट्रीय एमटीबी स्पर्धेत पटकावली तीन सुवर्णपदके*

शिर्डी (प्रतिनिधी) दि.५(उमाका)
ओडिशा येथे पार पडलेल्या २३व्या राष्ट्रीय एमटीबी (माउंटेन बाईक) सायकल स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रणिता सोमण हिने उत्कृष्ट कामगिरी करत वैयक्तिक तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिचे विशेष अभिनंदन केले असून, हे यश अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविणारे असल्याचे म्हटले आहे.
महेंद्रगिरी, ओडिशा राज्यात २३वी राष्ट्रीय एमटीबी सायकल स्पर्धेत प्रणिता सोमण हिने वैयक्तिक तीन सुवर्णपदके आणि महाराष्ट्राच्या संघाला एक रौप्यपदक मिळवून दिले.
तिने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे नाव उंचावले असून, राज्य शासनाच्या मानाच्या ‘शिवछत्रपती पुरस्काराने’ तिचा सन्मान झाला आहे.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रणिताच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की,”सायकलिंगसारख्या अतिशय खडतर एमटीबी क्रीडा प्रकारात प्रणिताने जिद्द आणि मेहनतीने मिळवलेले यश संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद आहे.”
तसेच, प्रणिताच्या या यशस्वी वाटचालीत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा खारीचा वाटा असल्याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले. यापूर्वी लोणी येथे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंना ‘क्रीडारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले असून, यावेळी प्रणिताच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला आहे. तिच्या या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातून आणि क्रीडा वर्तुळातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

साईयुग न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 8 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे